सत्यमेव जयते
Government of Maharashtra
Rural Development & Panchayat Raj Department, Mumbai

Mahalaxmi SARAS Exhibition cum Sale
Sale of Articles of Rural Artisan's Societies
Governor Chief Minister Deputy Chief Minister Minister for RD Minister for RD
मा. श्री. के. शंकरनारायणन,
महाराष्ट्राचे राज्यपाल
मा.ना.श्री. पृथ्वीराज चव्हाण,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
मा.ना.श्री. अजित पवार,
उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
मा.ना.श्री. जयंत पाटील,
ग्रामविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य
मा.ना.श्री. सतेज पाटील,
ग्रामविकास राज्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
Minister for RD Secretary, RDD
मा.श्री. जयंत कुमार बाँठिया,
मुख्य सचिव,
महाराष्ट्र शासन
श्री. एस.एस.संधू,
प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग,
महाराष्ट्र शासन
 

Mahalaxmi Saras 2013 / महालक्ष्मी सरस २०१३

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार, आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील विविध राज्यातील ग्रामीण कारागीर व स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव “महालक्ष्मी सरस २०१३” वांद्रे रेक्लमेशन, म्हाडा मैदान क्रमांक १, लीलावती हॉस्पिटल समोर, वांद्रे(पश्चिम), मुंबई-५० येथे दि.१८ जानेवारी २०१३ रोजी हे प्रदर्शन सुरु होईल व दि. ३ फेब्रुवारी २०१३ पर्यंत चालू राहील.

ग्रामीण भारताने जतन करून ठेवलेल्या पारंपारिक कलेचा निखळ वारसा पाहण्याची आपणास संधी आहे.या कारागीरांची उत्पादने आपण खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. या प्रदर्शनास आपण आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहण्याबद्दल आपणांस अगत्याने निमंत्रण आहे

 

ग्रामीण भारताच्या सर्जनशीलतेला भेट देण्याची अनोखी संधी

हस्तकला व हातमागाचा भारतास समृद्ध वारसा आहे. आधुनिक व पुरातन परंपरेच्या सुरेख संगमाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामीण उत्पादने व कलाकृतींमधील सर्जनशीलता, आल्हाददायक रंगसंगती यांमुळे मन प्रफुल्लीत होते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामीण कलाकारांच्या कलेचे जतन करणे व त्यांस प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास विभाग व्यापारी मेळाव्यांचे आयोजन करीत असतो. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळा प्रगती मैदान (आय.आय.टी.एफ.) चा एक भाग म्हणून "महालक्ष्मी सरस" चे आयोजन २००४ पासून करण्यात येत आहे. स्वर्णजयंती गरम स्वरोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण कारागीर एकत्र येऊन त्यांचा एक स्वयंसहाय्यता गट तयार करतात.त्यांना वस्तूंचे सामूहिकरीत्या उत्पादन व विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. अशा वस्तू प्रदर्शित करणे व त्यांची विक्री करणे यासाठी "महालक्ष्मी सरस" ही एक सुवर्णसंधी असते.

 

महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी उद्योग संधींची दालने

देशात एकूण ४० लाख स्वयंसहाय्यता गट आहेत. त्यापैकी तीस लाख गटांना कर्ज व अनुदानापोटी आठ हजार कोटींची मदत केंद्र शासनाने केली आहे. या वर्षी दहा हजार कोटी रुपयांपर्यंत मदतीचा आकडा जाईल. विशेष म्हणजे कर्ज परतफेड प्रमाण ९६ टक्के आहे. हे प्रमाण उद्योग शेती कर्जाच्या तुलनेत कौतुकास्पद आहे. स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून महिला उद्योग-व्यवसायाकडे वळत आहेत. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यास मदत होत आहे. महिला स्वयंसहाय्यता गट सुरू करतात. पैशाची बचतही करतात. बहुतेक वेळा त्यांना उद्योग सुरू करण्याची इच्छा असते पण नेमका कोणता उद्योग फायदेमंद ठरू शकतो, कोणता उद्योग आपणाला करता येईल याबाबत त्यांना माहिती नसते. त्यामुळे या पृष्ठावर महिला स्वयंसहाय्यता गटासाठी उपलब्ध असलेल्या असंख्य उद्योग संधींच्या दालनांपैकी काहींची ओळख आम्ही करुन दिलेली आहे.

 
Total SHGs / स्वयंसहाय्यता गट
922
 
Photo Gallery 2012
छायाचित्र दालन २०१२

SHGs / बचत गट

Members / सदस्य


महाराष्ट्र शासन

कार्यक्रमांची कालदर्शिका

October 2014
M T W T F S S
29 30 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31 1 2

जाहिराती :


जाहिरातींसाठी संपर्क :
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन